खंत...
माझ्या एका वहीत
तुझा मोरपीस अजुन,
तुझी मोरपंखी आठवण
किती ठेवियली जपुन.
एकदा तु दिलेल
एक फुल झकास,
अजुन तो गंध सनातन
माझ्या मुक्त हातास.
आता तसे प्रीतीचे बंधन नाही,
तशी रीत कदाचीत उरली नाही,
आभाळाला मातीचा गंध नाही,
मातीलाही त्याची खंत नाही .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)


0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा