तू असतीस तर ....

शनिवार, ५ डिसेंबर, २००९

तू असतीस तर ....
सोनपिवळ्या ऊन्हात
न्हाली असती नाजूक सकाळ
रंगाच्या गर्तेत अन्
मोहरली असती हरेक सांज
रंगबेभान वाऱ्‍यात
पाखरे झाली असती लयमग्न
भोवळभोळ्या गंधाने हळूवार
हसली असती हिरवळ रांगोळीच्या रंगांनी
मोहरली असते आठवणीचे अंगण
तुझ्याच धूंदीत
विरघळले असते मनभोर रुतू तुझ्यासाठीच नदीकाठी
बहरली असती अनेकरंगी फुलेतुझ्यासाठीच वरुणाने
गायले असते मेघमल्हार
कोऱ्‍या पानांवर लेखणीने
अवतरले असते सुगंधीक्षण
कोरले असते नभात .. ..
तुझे आभाळरंगी नाव
आणि अंथरली असती तुझिया पायांखाली
फुलपाखरांच्या पंखावरली नाजुकपंखी नक्षी
मीही तुझ्या नेञांतले
निखरले असते सोनसाळीक आभाळ
लयधुंद होऊन अन् केल्या असत्या
फुलतारकांच्या आभाळभर गोष्टी
पण तू असावी हे एक स्वप्नच होते
दिवस असे माझ्यासाठी निष्ठूर होते...

3 प्रतिक्रिया:

rahul maske म्हणाले...

khupach chhan kavita aahe.konalahi avadel asicha kavita aahe. hi kavita manjhe aaplya mannatale bol aahet asech vate.

asech lilht jaaaaaaaaa
hardik shubhechya

Rahul Maske
Parbhani

vidi म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
दिपक तेलंग्रे म्हणाले...

@Rohit
ध्यन्यवाद राहुल..!

टिप्पणी पोस्ट करा