तू असतीस तर ....

शनिवार, ५ डिसेंबर, २००९

तू असतीस तर ....
सोनपिवळ्या ऊन्हात
न्हाली असती नाजूक सकाळ
रंगाच्या गर्तेत अन्
मोहरली असती हरेक सांज
रंगबेभान वाऱ्‍यात
पाखरे झाली असती लयमग्न
भोवळभोळ्या गंधाने हळूवार
हसली असती हिरवळ रांगोळीच्या रंगांनी
मोहरली असते आठवणीचे अंगण
तुझ्याच धूंदीत
विरघळले असते मनभोर रुतू तुझ्यासाठीच नदीकाठी

आई तु आहेस माझी ....

आई तु आहेस माझी ....

आई तु आहेस माझी ....
सागरातील होडी , किनावरचे गाव
कुणीतरी कोरुन ठेवलेले ह्रदयातील नाव
आई तु आहेस माझे
एक मूर्तिमंत जग ,
धरतीस तूषार्त करणारे कूष्णकाळे ढग

आई तु आहेस माझी ....
स्वप्नसुंदर पहाट ,
रंगसुंदर सांजही
काल , उद्या आणि
आजही
तु आहेस माझ्यासाठी
थेँब थेँब पाऊसात भिजलेली
कण कण रक्तात वसलेली
माझ्या मनाचा थांग ,
ठाऊक असलेली माऊली

आई तु आहेस वात्सल्यरूप देवी ,
आयुष्यभराची कमाई
तु नाही मग कुणास म्हणू मी आई
तू आहेस
अशी एक जागा ,
जिथे उतरवून ठेवावा आयुष्याचा शीण
नतमस्तक होऊन जन्मोजन्मी ,
तुझ्या पदकमलात व्हावे लिन .

माझ्या इच्छेनं जर

माझ्या इच्छेनं जर

माझ्या इच्छेनं जर
तुला काही देता आलं असतं
तर तुझं अपार दुःख
ठेवलं असतं तुझ्या नकळत माझ्या झोळीत लपवुन आणि तुझ्या प्राक्तनाला
वाहीले असते
आयुष्यभर
माझ्या हर्षाचे आभाळभर क्षण .

चाहूल

चाहुल

अंधुक झालेली
स्वप्न माझी
ओस पडलेला
देह आहे
उद्याच्या स्वप्नालाही
कालचीच 'चाहुल' आहे .

असं वाटतं

असं वाटतं

असं वाटतं परतावे
ते मोरपंखी दिवस
आणि जुळून यावे तेव्हासारखे
स्वरपंखी सर्वागसुंदर गीत
पण तु माझ्या समिप येऊन
कराव्या आभाळभर गोष्टी
असे दिवसही नाही राहिले आता .

आठवणी

आठवणी

"चिमुकल्या वयाच्या
चिमुकल्या आठवणी
वयाबरोबरच आज
विस्तारत गेल्या आहेत
त्यांनाही माहित नाही
कदाचीत
त्या आता
कती वाढल्या आहेत !!"